Kalyanrao Kale: गंगापूरमध्ये पावसाअभावी पिके करपली; शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले खा. कल्याणराव काळे, १ लाखांची मदत देण्याची मागणी

Gangapur Crop Loss Kalyanrao Kale Demands Farmer Relief: गंगापूर तालुक्यात दुष्काळामुळे पिके करपली; काँग्रेसचे खा. कल्याणराव काळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत प्रतिहेक्टरी १ लाख मदत व सरसकट कर्जमाफीची मागणी, शासनाला ६ ऑक्टोबरपर्यंत अल्टीमेटम
Rainfall Deficit Hits Gangapur Crops Kalyanrao Kale Meets Farmers and Demands One Lakh Rupees Compensation Per Hectare

Rainfall Deficit Hits Gangapur Crops Kalyanrao Kale Meets Farmers and Demands One Lakh Rupees Compensation Per Hectare

esakal

Updated on: 

-रामेश्वर अमृते

गंगापूर : तालुक्यातील तुर्काबाद, मलकापूर, शिरोडी आणि डोमेगाव येथे पावसाच्या अभावी पिके करपून गेली आहे. या नुकसानग्रस्त पिकाची पाहणी काँग्रेसचे खा.कल्याणराव काळे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर यांनी ता. २७ रविवार रोजी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट पीक पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.नैसर्गिक आपत्ती आणि दुष्काळी परिस्थितीमुळे खचलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देत,नुकसानभरपाई व आर्थिक मदतीसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com