Crime
ESakal
- राजेंद्र व्यास
गंगापूर - जामिनासाठी आणि माहेरहून एक लाख रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी एका विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून, तिच्या दोन वर्षांच्या चिमुकल्या मुलीला बळजबरीने हिरावून घेत तिला घरातून हाकलून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात पती, सासू-सासरे आणि दिराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.