Gangapur News: एकीकडे दुष्काळ, दुसरीकडे विहिरीत पाण्याचा अखंड झरा! गंगापूर तालुक्यातील मालुंजा खुर्दमध्ये कुतूहल, पाहण्यासाठी गर्दी

Huge Water Spring Found in Well Amid Drought in Gangapur: शिवना नदी कोरडीठाक, पण शेतकऱ्याच्या विहिरीत पाण्याचा जोरदार प्रवाह; मालुंजा खुर्दमध्ये आश्चर्य
Maharashtra Drought News Water Spring Discovered During Well Digging in Malunja Khurd Farmers Gather to Witness the Flow

Maharashtra Drought News Water Spring Discovered During Well Digging in Malunja Khurd Farmers Gather to Witness the Flow

esakal

Updated on: 

-रामेश्वर अमृते

गंगापूर: यावर्षी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे दुष्काळाचे सावट आहे. पिके वाचवण्याचा जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. हतबल झालेला शेतकरी आपल्या शेतात विहीर किंवा बोरवेल मारण्यासाठी स्वतःची पदरमोड करून लाखो रुपये खर्च करून आपले नशीब आजमावत आहे. अशा या भीषण दुष्काळी परिस्थितीत तालुक्यातील मालुंजा खुर्द येथील एका शेतकऱ्याच्या विहिरीत खोदकामादरम्यान लागलेला पाण्याचा मोठा झरा सध्या संपूर्ण तालुक्यात कुतूहलाचा, चर्चेचा विषय ठरला आहे.

Loading content, please wait...