

Maharashtra Gangapur Farmer Robbery Two Helmeted Men Snatch 150000 Cash After Gold Loan Outside Bank On Saturday
esakal
-राजेंद्र व्यास
गंगापूर : आपल्या नातलगांकडून घेतलेले उसने पैसे परत करण्यासाठी एका वृद्ध शेतकऱ्याने स्वतःच्या घरातील सोने बँकेत तारण ठेवून कर्ज काढले. मात्र, ही रक्कम घेऊन बँकेसमोर उभे असतानाच भरधाव वेगाने आलेल्या दोन अज्ञात हेल्मेटधारी दुचाकीस्वारांनी या शेतकऱ्याच्या हातातील पिशवीला झटका मारून दीड लाख रुपयांची रोख लंपास केली. ही खळबळजनक घटना शनिवारी गंगापूर शहरातील महाराणा प्रताप चौक परिसरातील एका पतपेढीसमोर घडली.