Job Fraud
sakal
गंगापूर, ता. १७ (बातमीदार) : शासकीय रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून खासगी शिक्षिकेची १३ लाख ९६ हजार रुपयांची फसवणूक झाली. याप्रकरणी सासू-जावयाला शिल्लेगाव पोलिसांनी अटक केली. गंगापूर न्यायालयाने त्यांना १९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.