Gangapur News: गंगापुरात किरकोळ वादातून चाकूहल्ला; उपचारादरम्यान २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Six Suspects Arrested After Fatal Knife Attack in Gangapur City: गंगापुरात तरुणाच्या मृत्यूने खळबळ; चाकूहल्ला प्रकरणातील सहा संशयित आरोपी अटकेत
Gangapur Crime News Umesh Bhakkad Dies at Ghati Hospital After Knife Attack Following a Minor Dispute in the City Maharashtra

Gangapur Crime News Umesh Bhakkad Dies at Ghati Hospital After Knife Attack Following a Minor Dispute in the City Maharashtra

esakal

Updated on: 

-रामेश्वर अमृते

गंगापूर: शहरातील राजीव गांधी चौकात किरकोळ वादातून एका तरुणावर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत चाकूने सपासप वार करून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी (ता. ३०) रात्री मृत्यू झाला. या घटनेमुळे गंगापूर शहरात खळबळ उडाली आहे.उमेश उर्फ दत्तू संतोष भक्कड वय २३ रा. सखारामपंतनगर,गंगापूर असे मृत तरुणाचे नाव आहे. शहरातील सखारामपंतनगर येथे राहणारा उमेश हा मजुरी काम करून उदरनिर्वाह करत होता. बुधवारी ता.२८ सकाळी उमेशचा राहुल कुलारे व आतिष गायकवाड यांच्याशी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून त्याच दिवशी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास उमेश हा राजीव गांधी चौकातील एका चहाच्या हॉटेलच्या ओट्यावर बसलेला होता.

Loading content, please wait...