

Farmers Turn to Mechanization Amid Severe Labor Shortage
Sakal
रामेश्वर अमृते
गंगापूर : दिवसेंदिवस उसाच्या हंगामात ऊसतोड मजुरांची तीव्र टंचाई भासत असून मजुरांच्या मनमानी कारभाराला शेतकरी पुरते वैतागले आहेत. मुकादम आणि मजुरांना लाखो रुपयांची उचल देऊनही ऐनवेळी मजूर येत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. मात्र, या अडचणींवर मात करत तालुक्यातील ममदापूर येथील ताके बंधूंनी मजुराअभावी ऊसतोडणीसाठी यंत्र घेतले आहे.