

Police Raid on Illegal Gambling Den in Gangapur
esakal
रामेश्वर अमृते
गंगापूर : गंगापूर येथील बोलेगाव रस्त्यावरील तलावाजवळील एका लिंबाच्या झाडाखाली बेकायदेशीररीत्या रम्मी नावाचा जुगार खेळणाऱ्या अड्ड्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने धाड टाकली. या कारवाईत तिघांसह आणखी एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, रोख रक्कम, मोबाईल आणि चार दुचाकी असा एकूण १ लाख ९२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई शुक्रवारी दि. १८ सप्टेंबर सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास करण्यात आली.