

Gangapur Beef Seizure 360 Kg Meat and 15 Kg Animal Fat Recovered in Two Police Raids in Champura Three Booked Under Law
esakal
-रामेश्वर अमृते
गंगापूर: गोवंश हत्या बंदी असतानाही गोवंशाची बेकायदेशीर कत्तल करून मांस विक्रीच्या उद्देशाने साठवणूक केल्याचे दोन प्रकार गंगापूर शहरातील चमनपुरा परिसरात उघडकीस आले आहेत. गंगापूर पोलिसांनी रविवारी ता. २९ दोन स्वतंत्र ठिकाणी छापे टाकून ३६० किलो गोमांस आणि १५ किलो जनावरांची चरबी असा एकूण ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी तिघांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.