Illegal Sand Mining: शेंदूरवादा-शिवपूर परिसरात महसूल विभागाची धडक; ५५ लाखांचा अवैध वाळू मुद्देमाल जप्त, तिघांवर गुन्हा

शेंदूरवादा-शिवपूर परिसरातील अवैध वाळू वाहतुकीवर पहाटे महसूल विभागाचा धडक छापा; दोन हायवा, एक टिप्पर व पाच ब्रास वाळूसह ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
Revenue officials seized two Hyvas, a tipper and illegal sand worth ₹55 lakh during an anti-sand mining operation in Gangapur taluka.

Revenue officials seized two Hyvas, a tipper and illegal sand worth ₹55 lakh during an anti-sand mining operation in Gangapur taluka.

Sakal

Updated on

शेंदूरवादा : गंगापूर तालुक्यातील शेंदूरवादा व शिवपूर परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर महसूल विभागाने कारवाई करून दोन हायवा व एका टिप्परसह सुमारे ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल मंगळवारी (ता.4) पहाटे जप्त केला. याप्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com