Gangapur Accident : गंगापूर हादरले! हळदीला निघालेल्या १७ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थिनीचा कंटेनरच्या धडकेत मृत्यू, वडील गंभीर

नातेवाईकाच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी दुचाकीवरून जात असताना कंटेनरच्या धडकेत अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या १७ वर्षीय तेजल प्रधान हिचा जागीच मृत्यू झाला.
Tejal Pradhan

Tejal Pradhan

sakal

Updated on

- राजेंद्र व्यास

गंगापूर - गंगापूर तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे राष्ट्रीय महामार्गावर ढोरेगाव परिसरात शुक्रवारी दुपारी भीषण अपघात झाला. नातेवाईकाच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी दुचाकीवरून जात असताना कंटेनरच्या धडकेत छत्रपती संभाजीनगर येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या १७ वर्षीय तेजल काकासाहेब प्रधान हिचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात तिचे वडील काकासाहेब गिरजाबा प्रधान (४६) गंभीर जखमी झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com