

माजलगाव : चारशे रुपये प्रतिकिलो दराने विकल्या जाणाऱ्या लसणाचे दर काही प्रमाणात कमी झाले असले, तरी सद्य:स्थितीत शहरातील आठवडी बाजारात प्रतिकिलो ३२० रुपये दराने लसूण मिळत आहे. मनुक्याच्या दरापेक्षाही लसूण महागल्याने लसणाची पाकळी ‘ड्रायफ्रुट’ला भारी असं म्हणण्याची वेळ सर्वसामान्य नागरिकांवर आली आहे.