

Parbhani Gas Booking Trouble
esakal
परभणी : गॅस सिलिंडर बुकिंगचे ऑनलाइन सर्व्हरच डाउन असल्याने जिल्ह्याभरातील ग्राहकांचे हाल होत असून, अफवांचे पेव उठल्याने गोंधळात भर पडली आहे. प्रत्येक जण चौकशीसाठी गॅस एजन्सीकडे धाव घेत असल्याचे चित्र सर्वत्र बघावयास मिळाले. दरम्यान, जिल्ह्यात सिलिंडरचा मुबलक साठा असून ग्राहकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.