
गेवराई : एक-दोन दिवस झालेल्या अति पावसामुळे कपाशीत आकस्मिक मर आली. पीक हातच गेल.त्यामुळे खचलेल्या गेवराईतील शेतकऱ्याने मायबाप सरकार मदत करा, सांगा आता आम्ही जगायचं कसं? असा टाहो केल्यानंतर प्रशासनाकडून बांधावर जात त्या शेतकऱ्याच्या पीक नुकसानीचा गुरूवारी (ता ३१) पंचनामा करण्यात आला.