गेवराई - आजच्या भौतिक आणि स्वार्थाच्या युगात जेव्हा मोठमोठ्या श्रीमंतांनी समाजापासून तोंड फिरवले आहे. मात्र, एका साध्या हातगाडीवर भाजीपाला टाकत 'कांदे घ्या,बटाटे घ्या' असे म्हणून गल्ली-बोळात फिरत कुटुंबीयाचा उदरनिर्वाह भागवत असलेल्या गेवराईतील एका तरुणाने सहारा अनाथालयातील एका चिमुरीडीला दत्तक घेत समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे.