
Asaduddin Owaisi: नुकसान परक्यांपासून नव्हे आप्तांपासून होते. त्या गद्दारांचा चेहरा समोर आला. त्यांच्यावर आता विश्वास ठेवता येणार नाही. मुस्लिम समाजासाठी निष्ठेने लढलेल्यांचा विकल्या न गेलेल्यांचाही चेहराही जनतेसमोर आहे.
त्यामुळे येत्या महापालिका निवडणूकीच्या कामाला लागा. समाजाची सेवा करा त्यांचा आवाज बना. समाज म्हणेल त्याला उमेदवारी देवू फक्त एकजुटीने लढा. पण आत्तापासून कोणीही स्वतःहूनच दावेदार समजू नका. असे एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीने औवेसी म्हणाले.