

Beed News
esakal
गेवराई: विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वी गेवराई तालुक्यातील रस्त्यांवर डांबराचा सुवास दरवळत होता. नारळ फुटले, निविदा निघाल्या आणि मोठ्या थाटामाटात कामांना सुरवातही झाली. मात्र, जशी निवडणूक झाली तशीच या विकासकामांची गतीही मंदावली. का आणि कशासाठी ही कामे थांबली, हे आता उमजू लागले आहे. पूर्वीची मंजूर कामे आजच्या काळात करणे परवडत नसल्याचे कारण पुढे येत असल्याने, रस्त्यांची झालेली ही वाताहत चिंताजनक आहे. परिणामी, गेवराई तालुक्यातील ग्रामस्थांमधून आता संतापाची लाट उसळताना दिसत आहे.