
गेवराई : फेब्रुवारीपासून गेवराईतील २५७ स्वस्त धान्य दुकानातून गव्हाऐवची ज्वारीचे वाटप करण्यात येत आहे.दरम्यान, वाटप होत असलेल्या ज्वारीत फुफाटा अन् पिठ व किडे व किडकी ज्वारी वाटप होत असलेल्या तक्रारी रेशन धारकांकडून होत असल्याने काही कार्डधारक ज्वारी ऐवजी तांदूळच द्या अशी मागणी दुकानदार यांच्याकडे करत असून, मग साहेब फुफाटा असलेल्या ज्वारीची भाकरी खायची तरी कशी अशा प्रतिक्रिया रेशन धारकांत होत आहेत.