
ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व पिकअपची जोरदार धडक झाली.
ट्रॅक्टर-पिकअपचा भीषण अपघात; बाप-लेक जागीच ठार, ३ जखमी
गेवराई - तालुक्यातील राक्षसभुवन रोडवर रात्री अकराच्या सुमारास भीषण अपघात झाला. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व पिकअपची जोरदार धडक झाली. यामधे दोन जण जागीच ठार झाले तर तीन जण गंभीर जखमी झाले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अपघात इतका भीषण होता की यामध्ये बाप-लेक जागीच ठार झाले. चंद्रशेखर शामराज पाठक ( वय 39)वर्ष व त्यांचा मुलगा आर्यन चंद्रशेखर पाठक ( वय 12 )वर्ष दोघे रा. राक्षसभुवन यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगी मंजरी चंद्रशेखर पाठक ( वय 11) वर्ष हिच्या सह इतर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
जखमींना बीड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलीस स्टेशन चे पोलीस कर्मचारी घटना स्थळी धाव घेऊन पंचनामा करुन शव विच्छेदना साठी तात्काळ गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Web Title: Gevrai Tractor Pick Up Accident 2 Died 3 Injured
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..