OBC Reservation : घनसावंगीत OBC आरक्षण बचाव महामोर्चा; तहसीलदारांना विविध मागण्याचे निवेदन

मराठा समाजाला कोणत्याही परिस्थतीत सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र  देवू नये
OBC Reservation : घनसावंगीत OBC आरक्षण बचाव महामोर्चा; तहसीलदारांना विविध मागण्याचे निवेदन

घनसावंगी : ओबीसी समाजच्यावतीने विविध मागण्यासाठी ओबीसी आरक्षण बचाव महा मोर्चा काढण्यात आला या मोर्चाला नवीन बसस्थानकापासून सुरूवात झाली. जुने पोलिस स्टेशन , बाजारचौक, तहसील कार्यालयासमोर विसर्जन करण्यात आला.  

मराठा समाजाला कोणत्याही परिस्थतीत सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र  देवू नये, बिहारच्या धर्तीवर राज्यात जातीनिहाय सर्व्हेक्षण  करावे, संपूर्ण देशात जातीनिहाय जनगणंना करण्याची शिफारस राज्यसरकारने केंद्रसरकारकडे करावी, ओबीसी प्रवर्गात मराठा समाजांचा समावेश करण्यात येवू नये, ओबीसी भटके विमुक्तांच्या न्याय हक्कासाठी शासन आपल्या दारी या उपक्रमांची अंमलबजांवणी करण्यात यावी,

सात सप्टेंबरचा शासनांने काढलेला आदेश रद्द करण्यात  ओबीसी  समाजाच्या विध्यार्थ्यासाठी मंजूर 72 वस्तीगृह सुरू करण्यात यावी, वस्तीगृहात प्रवेश न मिळालेल्या विध्यार्थ्यासाठरी स्वाधार योजनेतंर्गत शिष्यवृत्ती आणि फ्रीशिप योजना त्वरती लगू करावी, नॉन क्रिमीलेयरची आठ लाखांची मर्यादा रद्द करण्यात यावी,

ओबीसी समाजाला अ‍ॅट्रोसिटी कायद्यांचे सरंक्षण मिळावे,  जिल्हा परिषद प्राथमीक शाळांचे खाजगी करण करण्यात येवू नये आदी मागण्याचे निवेदन महिलांच्या हस्ते तहसीलदार योगीता खटावकर यांना देण्यात आले. या आंदोलनात घनसावंगी तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी व सकल ओबीसी समाज सहभागी झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com