Beed News: विद्यार्थ्यांची कोंडी, महिलांची सुरक्षा ऐरणीवर;घाटनांदूरचे बसस्थानक प्रवाशांच्या सोयीचे की गैरसोयीचे? उपाययोजनांची मागणी

Current Condition of Ghatanandur Bus Station: घाटनांदूर बसस्थानकात विद्यार्थ्यांची कोंडी, महिलांची सुरक्षा धोक्यात. विजेची कमतरता आणि स्वच्छतेची समस्या प्रवाशांसाठी गंभीर आहे. प्रशासनाने उपाययोजना करणे आवश्यक.
Beed News

Beed News

esakal

Updated on

घाटनांदूर: सूर्यास्त झाला की गावातील गजबजलेल्या बसस्थानकावर भयाण शांतता आणि काळोखाचे राज्य सुरू होते. हा काळोख केवळ प्रकाशाचा अभाव नाही, तर तो प्रवाशांच्या मनात भीती निर्माण करणारा ठरतोय. हजारो विद्यार्थ्यांची ये-जा, रुग्णांची धावपळ आणि व्यापाऱ्यांची लगबग ज्या ठिकाणाहून होते, ते घाटनांदूरचे बसस्थानक आज प्रशासकीय दुर्लक्षाच्या गर्तेत अडकले आहे. बसची वाट पाहताना प्रवाशांना आता वेळ नाही, तर आपला जीव सांभाळण्याची चिंता करावी लागत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com