

Beed
esakal
घाटनांदूर: घाटनांदूर येथील अण्णाभाऊ साठे चौकात शनिवारी (ता.११) रात्री एका एकवीस वर्षीय तरुणाची तीक्ष्ण हत्यारे आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची भयानक घटना उघडकीस आली आहे. ज्ञानेश्वर उतरेश्वर वाकडे (वय २१, रा. पट्टीवडगाव) असे या मृत तरुणाचे नाव असून या जीवघेण्या हल्ल्यात त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. भररस्त्यात घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे परिसरात मोठी दहशत पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.