शिवसेनेचे परभणी महापालिकेत घेराव आंदोलन

गणेश पांंडे
शनिवार, 30 जून 2018

परभणी : रमाई घरकुल योजनेंतर्गत दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांना जाणीवपूर्वक वगळण्याचे षड्ःयंत्र तसेच पंतप्रधान आवास योजनेतून झोपडपट्टी भाग वगळण्यात आल्याच्या निषेधार्थ आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (ता.30) महापालिकेच्या कार्यालयास घेराव आंदोलन करण्यात आले. 

परभणी शहरातील हजारो गोरगरीब जनतेने मागील 5 ते 6 वर्षापासून आपल्याला हक्काचे घरकुल मिळावे,याकरीता मोलमजुरी करुन पैसे जमवले. मोठ्या अपेक्षेने घरकुलाच्या फाईली तयार करुन महापालिकेस सादर केल्या. पाठापोठ महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला. तसेच महापालिकेद्वारे त्याकरिता जागेची पाहणी सुद्धा करण्यात आली. परंतू हे काम पुढे सरकले नाही. विशेष म्हणजे घरकुल योजनेचा 45 कोटी रुपयांचा निधी मागील अनेक महिन्यांपासून महापालिकेकडे पडून आहे.

मात्र, प्रशासनाने रमाई घरकुल योजनेच्या अटीमध्ये जाणिवपूर्वक बदल करून 2011 च्या जनगणनेच्या निकषाचे कारण देत सदर योजनेतील दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना हेतुपुरस्सर वगळण्याचे षड्ःयंत्र रचले असल्याचा आरोप आमदार डॉ. राहूल पाटील यांनी यावेळी केला. या कारणामुळे शिवसेनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला असून शनिवारी (ता.30) आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या नेतृत्वात महापालिकेला घेराव घालण्यात आला. यावेळी आमदार डॉ. राहूल पाटील, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख डॉ.विवेक नावंदर, माजी जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आनेराव, विजय वाकोडे, अनिल डहाळे, अंबिका डहाळे, विशू डहाळे, प्रशास ठाकूर आदी उपस्थित होते.

Web Title: Gherao movement in the Parbhani Municipal Corporation of Shivsena