मुलीच्या मैत्रिणीचा फोन येताच पोलिसांनी तत्परता दाखवली. कुठलाही वेळ न दवडता अहिल्यानगरकडे कूच केली. पण, त्या मुलीने केवळ पालक रागावल्याने हा बनाव रचल्याचे उघड झाल्याने पोलिसांचा जीव भांड्यात पडला.
जालना : पोलिसांच्या दामिनी पथकाचे कार्यालय. मंगळवारी (ता. चार) सायंकाळी फोन खणखणला. पलीकडून कापऱ्या आवाजात एक मुलगी बोलायला लागली, ‘साहेब, अंबडमधून माझ्या मैत्रिणीचे कुणीतरी अपहरण (Girl Kidnapping) केले. ती अहिल्यानगरमध्ये आहे. प्लीज प्लीज तिला वाचवा!’ तिचे हे बोलणे ऐकून पोलिस यंत्रणा अलर्ट झाली. जालना पोलिस दलातील (Jalna Police Force) ‘भरोसा सेल’चे पथक तत्काळ अहिल्यानगरकडे रवाना झाले. तिथून मुलीला ताब्यात घेतले.