औरंगाबाद : टीव्ही डोक्‍यात पडून चिमुकली ठार, वाळूजची घटना 

आर. के. भराड
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

उपचारादरम्यान झाला मृत्यू

वाळूज (जि. औरंगाबाद) - घरात खेळता-खेळता घरातील टेबलावर ठेवलेली टीव्ही डोक्‍यात पडून दीड वर्षाची चिमुकली ठार झाली. ही घटना वाळूज परिसरातील वडगाव (कोल्हाटी) येथे गुरुवारी (ता. 26) दुपारी घडली. 

वडगाव (कोल्हाटी) येथील फुलेनगरातील मानवी विकास दाभाडे ही बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास घरात खेळत होती. त्याच वेळी घरातील टेबलावर ठेवलेला टीव्ही तिच्या डोक्‍यात पडला. यात मानवी गंभीर जखमी झाली. तिला अशोक शांताराम दाभाडे यांनी घाटी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मानवीचा गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girl killed at waluj