esakal | त्या मुलीचा विहिरीत सापडला मृतदेह; मागील दहा दिवसापुर्वी अपहरणाची होती तक्रार

बोलून बातमी शोधा

file photo}

त्या मुलीचा मृतदेह एका विहिरीत मंगळवारी (ता. दोन) सकाळी कामठा फाटा शिवारात सापडल्याने त्या मुलीच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

marathwada
त्या मुलीचा विहिरीत सापडला मृतदेह; मागील दहा दिवसापुर्वी अपहरणाची होती तक्रार
sakal_logo
By
सय्यद अतिक

आखाडा बाळापूर ( जिल्हा हिंगोली ) : राज्यस्थान राज्यातून येऊन येथील लोकांचे मनोरंजन करुन उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील एका नऊ वर्षीय मुलीचे मागील दहा दिवसांपूर्वी अपहरण करण्यात आले होते. त्या मुलीचा मृतदेह एका विहिरीत मंगळवारी (ता. दोन) सकाळी कामठा फाटा शिवारात सापडल्याने त्या मुलीच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की आखाडा बाळापुरपासून जवळ असलेल्या कामठा फाटा शिवारामध्ये मागील दहा ते पंधरा दिवसापूर्वी राजस्थान राज्यातील टोक जिल्ह्यातील बहिर मुल्ला या गावातील काही कुटुंबे आखाडा बाळापुर व परिसरातील लोकांचे मनोरंजन करुन त्यावर उदरनिर्वाह करण्यासाठी आलेले होते. लोकांना विविध खेळ व मनोरंजन दाखवून त्यावर उपजीविका करणाऱ्या या कुटुंबातील रेश्मा गुड्डू शहा या नऊ वर्षीय मुलीचा मागील दहा दिवसापूर्वी अपहरण करण्यात आल्याची तक्रार सदरील कुटुंबीयांनी आखाडा बाळापुर पोलिस स्थानकात दिली होती.

या तक्रारीची दखल व गंभीर घेत स्वतः पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, बाळापूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी हुंडेकर, अच्युत मुपडे, श्रीनिवास रोयलवार, फौजदार प्रतिभा शेटे, जमादार संजय मार्के, सुरेश नागरे यांच्या पथकाने घेऊन संपूर्ण परिसर पिंजून काढला होता. परंतु हरवलेली मुलगी सापडली नव्हती मागील दहा दिवसांपासून सापडले नसल्याने पोलीस प्रशासन हतबल झाले होते.

शेवटी मंगळवारी सकाळी कामठा शिवारातील वीज वितरण कंपनीचा १३२ केव्हीच्या पाठीमागील शेतातील विहिरीमध्ये सदरील मुलीचा मृतदेह
बाजूला असलेल्या शेतातील हरभरा काढणाऱ्या महिला मजुरांना दिसल्याने त्यांनी तशी माहिती आखाडा बाळापुर दिल्याने रवी हुंडेकर व त्यांच्या पथकाने जाऊन मुलीची शहानिशा केली व कुटुंबीयांना सोबत घेत मुलगी दाखवली. हिच मुलगी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्या कुटुंबीयांनी त्या परिसरात मोठा हंबरडा फोडला यावेळी येथे उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले होते. यावेळी परिसरात मोठा जमाव जमा झाला होता. घटनास्थळी पोलिस पोहोचले असुन पुढील प्रक्रिया सुरु होती.

संपादन- प्रल्हाद कांबळे