केज - 'पुरोगामी विचाराच्या बीड जिल्ह्यात संतोष देशमुख या तरूण सरपंचाचा निर्दयपणे झालेली हत्या ही दुर्दैवी घटना असल्याचे शनिवारी (ता.२१) मस्साजोग येथील भेटीदरम्यान खासदार शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना सांगितले..तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यामुळे शरद पवार यांनी दुपारी देशमुख यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी खासदार बजरंग सोनवणे, निलेश लंके, आमदार संदीप क्षीरसागर व माजीमंत्री राजेश टोपे उपस्थित होते..हेलिपॅडवरून येऊन शरद पवार यांनी देशमुख कुटुंबियाची भेट घेऊन आस्थेवाईकपणे विचारपूस केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांसमोर बोलताना शरद पवार म्हणाले, गावाच्या विकासाचा ध्यास असणाऱ्या तरूण सरपंच संतोष देशमुख याचे अपहरण करून निर्दयपणे हत्या करणे ही अत्यंत दुर्दैवी व वेदनादायक घटना आहे..केंद्र व राज्य शासनाने या घटनेचे गांभीर्य ओळखून जलद गतीने तपास करून भयभीत झालेल्या जनतेला विश्वास दिला पाहिजे. या घटनेतील सर्व दोषींना तात्काळ अटक करून यातील दोषींना कठोर शिक्षा करून कुटुंबाला न्याय दिला पाहिजे..वडीलांचा आधार गेलेल्या सरपंचांचा मुलगा व मुलीच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी व शक्य ती अर्थिक मदत करणार आहे. या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचा विश्वास दिला. यापुढे सामाजिक सलोखा जपण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन शरद पवारांनी उपस्थितांना केले..आता घाबरून व गप्प बसून चालणार नाही, गुंडगीरी प्रवृत्तीच्या विरोधात लढा उभारावा लागेल.- आमदार, संदीप क्षीरसागरआमच्या सारख्या लोकप्रतिनिधींच्या जीविताला धोका आहे, सामान्य जनतेच काय? वाढत्या गुंडगीरीची चिंता आहे.- खासदार, बजरंग सोनवणे.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.