

jitesh antapurkar ncsl legislative summit 2026 chicago usa deglur biloli
Sakal
देगलूर : देगलूर–बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांना अमेरिकेतील शिकागो येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित 'एनसीएसएल लेजिस्लेटिव्ह समिट–२०२६' या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्याची संधी लाभली आहे. जागतिक पातळीवरील धोरणनिर्मिती, लोकशाही बळकटीकरण आणि शाश्वत विकासासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी विविध देशांतील लोकप्रतिनिधी आणि धोरण तज्ज्ञांशी संवाद साधला.