Goa Foreign Liquor: डिकसळ येथे गोव्यातील प्रतिबंधित विदेशी मद्याचा 7.89 लाखांचा साठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

गोव्यातून महाराष्ट्रात प्रतिबंधित विदेशी मद्याची अवैध आयात उघड; डिकसळ येथील घरावर छापा टाकून 7.89 लाखांचा साठा जप्त
The State Excise Department seized illegal Goa-made foreign liquor worth ₹7.89 lakh during a raid at Diksal near Kalamb, registering a case against the accused under the Maharashtra Prohibition Act.

The State Excise Department seized illegal Goa-made foreign liquor worth ₹7.89 lakh during a raid at Diksal near Kalamb, registering a case against the accused under the Maharashtra Prohibition Act.

Sakal

Updated on

कळंब : अवैध मद्याची आयात, वाहतूक, साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेत कळंब शहरालगत असलेल्या डिकसळ येथे मोठी कारवाई करण्यात आली. गोवा राज्यातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेले विदेशी मद्य अवैधरित्या आयात करून विक्रीसाठी साठवून ठेवल्याप्रकरणी एका आरोपीसह इतरांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून 7 लाख 89 हजार रुपयाचे मद्य जप्त करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com