

A 60-year-old fisherman died of a suspected electric shock while retrieving his fishing net from the floodwaters of the Godavari River at June Kaigaon in Gangapur taluka. Villagers have demanded an inquiry, alleging negligence in disconnecting power supply near the river.
Sakal
कायगाव : गोदावरीच्या पुराच्या पाण्यात कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मासेमारीचे जाळे काढण्यासाठी उतरलेल्या एका ज्येष्ठ मच्छीमाराचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी (ता. ६) दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास गंगापूर तालुक्यातील जुने कायगाव येथे घडली. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला असून बिरुटे कुटुंबाचा कर्ता आधार कायमचा हरपला आहे.