

Hingoli News
esakal
पाथरी: तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रात वाळूमाफियांकडून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर अवैध उपसा सुरू झाला आहे. ‘केनी तराफे’ आणि ‘यारी’ (यांत्रिक क्रेन) च्या साह्याने दिवसाढवळ्या वाळू उपसली जात आहे. डाकुपिंप्री हा शासनाचा अधिकृत वाळूघाट सध्या बंद असून, अनधिकृत वाळू उपसा मात्र सर्रास सुरू आहे, हे विशेष. वाळूच्या धंद्यात ‘सर्वपक्षीय यारी’ असल्याने कारवाई होत नसल्याचे ग्रामस्थांतून बोलले जात आहे.