

Paithan Godavari River Rescue Three Women Saved From Drowning by Two Young Men Who Showed Courage and Quick Thinking
sakal
विहामांडवा : नवगाव(ता. पैठण) येथे गोदावरी नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तीन महिला अचानक खोल पाण्यात बुडू लागल्याची घटना मंगळवारी (ता. १५) दुपारी घडली. मात्र, नदीत पोहत असलेल्या दोन तरुणांनी क्षणाचाही विलंब न लावता दाखवलेल्या धाडसामुळे तिघींचेही प्राण बालंबाल वाचले.