गोगाबाबा टेकडी परिसरात आढळला तरुणाचा मृतदेह

मनाेज साखरे
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

औरंगाबाद - पंधरा दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणाचा गोगाबाबा टेकडीच्या पायथ्याशी बुधवारी (ता.18) सकाळी मृतदेह आढळला. डोक्‍यावर जखम व गळा आवळून खून केलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. 

औरंगाबाद - पंधरा दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणाचा गोगाबाबा टेकडीच्या पायथ्याशी बुधवारी (ता.18) सकाळी मृतदेह आढळला. डोक्‍यावर जखम व गळा आवळून खून केलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, शफिक खान रफिक खान (वय 28 , रा.कुतुबपुरा, जयसिंगपुरा) असे मृताचे नाव आहे. शफिक खान घाटी रुग्णालय प्रवेशद्वाराजवळील बाबू टी हाऊस येथे वेटर होता. पहिल्या पत्नीचा वर्षभरापूर्वी बाळंतपणानंतर मृत्यू झाला. त्याला एक मुलगा असून यानंतर त्याने दुसऱ्यांदा संसार थाटला होता. कुटुंबीयांनी त्याचे 30 ऑगस्टला दुसरे लग्न लावून दिले होते. गत तीन दिवसांपासून शफिक कामावर गेला नाही. तो बेगमपुऱ्यातील एका चहाच्या हॉटेलवर बसत होता. रात्री जेवणानंतर टाऊन हॉल येथील एका टपरीवर तो बार खाण्यासाठी जात होता. मंगळवारी जेवणानंतर तो बार खाण्यासाठी घरातून बाहेर गेला; परंतु घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. रात्री मित्र व काही नातेवाइकांकडे त्याला शोधले. बुधवारी पहाटे फिरण्यासाठी आलेल्या काही नागरिकांना गोगाबाबा टेकडीच्या पायथ्याशी छत्री मैदानाजवळ मृतदेह दिसला. याची माहिती त्यांनी बेगमपुरा पोलिसांना दिली. यानंतर बेगमपुरा ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन सानप, उपनिरीक्षक सय्यद सिद्दिकी, गुन्हेशाखेचे निरीक्षक मधुकर सावंत व पोलिस पथक घटनास्थळी पोचले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह घाटी रुग्णालयात पाठविला. 

जयसिंगपुरा भागातील एका व्यक्तीने मृतदेह पाहताच तो शफिकचा असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी शफिकच्या कुटुंबीयांना बोलावून खात्री केली. शफिकला मृत पाहून त्यांनीही हंबरडा फोडला. 

सूत्रांनी सांगितले, की शफिकच्या डोक्‍यावर जखम असून, त्याचा गळा आवळून खून झाला. या प्रकरणात पोलिस कामाला लागले असून, रात्री उशिरापर्यंत शफिकचे नातेवाईक ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले नव्हते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the Gogababa hill area The young man's body was found