चांगली बातमी : हिंगोलीमध्ये होणार ३० खाटांचे आयुष रुग्णालय- हेमंत पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खासदार हेमंत पाटील

चांगली बातमी : हिंगोलीमध्ये होणार ३० खाटांचे आयुष रुग्णालय- हेमंत पाटील

हिंगोली : राष्ट्रीय आयुष अभियान कार्यक्रमातंर्गत हिंगोली येथे ३० खाटांचे आयुष रुग्णालय (AYUSH Hospital)लवकरच कार्यान्वीत होणार असून याकरिता केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक (minister shripad naik) आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे खासदार हेमंत पाटील (Mp Hemant patil) यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करुन मंजुरी मिळवून आणली आहे. ( Good news: 30-bed AYUSH Hospital to be set up in Hingoli)

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्हा आणि लोकसभा क्षेत्रातील आरोग्य यंत्रणा मजबूत करण्याच्या उद्देशाने खासदार हेमंत पाटील यांनी मतदार संघाचा दौरा केला होता. यादरम्यान अनेक ठिकाणी आढळून आलेल्या असुविधांबाबत संबंधितांना सूचना आणि निर्देश देऊन सुविधा करून घेतल्या आहेत. आयुष राष्ट्रीय मंत्रालयांतर्गत देशातील सर्वसामान्य जनतेला आरोग्य सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिकोनातून आयुष मंत्रालयाने जिल्हास्तरावर आयुष रुग्णालय स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला असून त्याच अनुषंगाने प्रत्येक जिल्हाच्या ठिकाणी आयुष रुग्णालय स्थापनेस मंजुरी दिली आहे.

हेही वाचा - कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मराठवाड्यातील परभणीसह बीड, उस्मानाबाद, लातूर व जालना येथील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.

हेमंत पाटील यांनी याबाबत सन २०१९ मध्ये केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती. तसेच राज्यशासनाकडे सुद्धा याबाबत पाठपुरावा केला होता. त्यानुसार राज्यशासनाच्या आरोग्य विभागाकडून आयुष रुग्णालयांकरिता मंजुरी दिली आहे. याबाबतचा प्रस्ताव तात्काळ तयार करुन दाखल करण्याचे निर्देशसुद्धा हिंगोली जिल्हा आरोग्य यंत्रणेला देण्यात आले आहेत. त्यानुसार आता रुग्णालय स्थापनेच्या प्रक्रियेला वेग आला असून हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातील मोकळ्या जागेची पाहणी करण्यात येत आहे आली आहे.

राज्यात यापूर्वी अहमदनगर, नंदुरबार, सिंधुदुर्ग आणि पुणे या चार ठिकाणी ३० खाटांच्या आयुष रुग्णालयास मंजुरी मिळाली असून, निधीसुद्धा उपलब्ध झाला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यात आयुष रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहेत. त्यामध्ये हिंगोली जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. आयुष रुग्णालयामुळे हिंगोली जिल्हा आणि मतदारसंघातील आरोग्य यंत्रणेला बळकटी मिळणार आहे, तसेच रुग्णांना चांगल्या दर्जाचा औषधोपचार मिळणार आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image
go to top