esakal | चांगली बातमी : महाराष्ट्रात कोरोनाचा मुक्काम पुढचे काही दिवस- प्रसिद्ध सर्जन डॉ. क्यातमवार
sakal

बोलून बातमी शोधा

dr. kyatamwar

चांगली बातमी : महाराष्ट्रात कोरोनाचा मुक्काम पुढचे काही दिवस- प्रसिद्ध सर्जन डॉ. क्यातमवार

sakal_logo
By
संजय बर्दापूरे

वसमत ( जिल्हा हिंगोली ) : काळजी घ्या पण काळजी करु नका असा रुग्ण, नातेवाईकांना जिव्हाळ्याचा सल्ला देतानाच येत्या दहा दिवसांत अख्या महाराष्ट्रातून कोरोना विषाणू हद्दपार होणार असल्याचे जे. जे. ररुग्नालय मुंबईचे माजी वैद्यकीय अधिक्षक, प्रसिद्ध सर्जन तथा डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मारोती क्यातमवार यांनी सकाळशी बोलताना सांगीतले.

महाराष्ट्रात एक मार्चपासून कोरोनाची दुसरी लाट सक्रीय झाली. दुसऱ्या लाटेच्या संक्रमनाने अपेक्षेपेक्षा खुप जास्त रुग्णांची संख्या वाढली. परिणामी पुर्ण महाराष्ट्रात वैद्यकीय सेवा अपुरी पडू लागली आहे. शासन, प्रशासन वैद्यकीय सेवा कमी पडू नये यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करीत आहे. यावर संबंध नागरीकांना दिलासा देणारी बातमी डॉ. क्यातमवार यांनी दिली आहे. त्यांनी काळजी घ्या पण काळजी करु नका, मास्क, सोशल डिस्टन्सिंग व सँनिटायझर या त्रिसुत्रीचा वापर करा, विनाकारण बाहेर पडू नका असा मौलिक सल्ला दिला आहे.

हेही वाचा - चांगली बातमी : नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्न बरे होण्याचे प्रमाण ८० टक्के; मृत्यूचेही प्रमाण घटले

त्याबरोबरच अंग दुखत असेल, ताप असेल, हातपाय ओढत असतील अशावेळेस दुखने अंगावर न काढता तात्काळ डॉक्टरांना दाखवून प्राथमिक औषधोपचार घ्यावा. सुरुवातीलाच औषधोपचार घेतल्याने जरी कोरोना संसर्ग झाला तरी तो आटोक्यात येतो. विशेष म्हणजे मृत्यू येण्याचा अजिबात धोका नसतो हा आमचा अनुभव असल्याचे त्यांनी सांगीतले. मात्र अंगावर आजार काढला तर आजार बळवण्याची, रुग्ण अतिगंभिर होण्याची जास्त शक्यता आहे. शासकीय बरोबरच प्रशासनाने खाजगी कोविड सेंटरना परवानगी दिलेली आहे. त्यामुळे रुग्णांनी घाबरुन न जाता डॉक्टरावर विश्वास ठेवून तात्काळ औषधोपचार घ्यावा.

यापूर्वी ब्राजील आणि ब्रिटनमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली. ती अडीच महिन्यांत आटोक्यात आली आहे हा अनुभव आहे, भविष्य नाही. आपल्याकडे दुसरी लाट एक मार्चला सुरु झाली आहे. एप्रिल नंतर दोन महिने होतात. त्यामुळे अवघ्या दहा ते पंधरा दिवसांत कोरोना महाराष्ट्रातून हद्दपार होणार आहे. दुसरं म्हणजे एप्रिल महिन्यात मुस्लिम बांधवांचा रमजान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, पाडवा, रामनवमी, गुडफ्रायडे आलेला आहे याचाच अर्थ आपण सगळ्यांनी मिळून कोरोनावर विजय मिळवायचा आहे. म्हणजेच सर्व जाती धर्माच्या लोकांनी, राजकारण्यांनी, डॉक्टरांनी मिळून कोरोना विरोधी लढा दिला आहे. त्यामुळे कोरोनाचा मुक्काम आता केवळ दहा ते पंधरा दिवसच असून नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घ्यावी असे आवाहन डॉ. क्यातमवर यांनी केले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image