चांगली बातमी : नवरात्रीनिमित्त भोगाव तिर्थक्षेत्र परिसरात फळझाडांचे वृक्षारोपन

file photo
file photo

जिंतूर (जिल्हा परभणी) : तालुक्यातील तीर्थक्षेत्र भोगाव येथे जगदंबेच्या दर्शनासाठी आलेल्या चाळीस कुटुंबातील सदस्यांनी नवरात्रीनिमित्त भोगावदेवी पर्यटनस्थळी एका दिवसात वेगवेगळ्या प्रकारच्या पाचशे फळ झाडांची लागवड केली.

जिंतुर तालुक्यातील भोगाव देवी येथे वृक्षप्रेमी, साहित्यिक अण्णासाहेब जगताप यांच्या संकल्पनेतून व देवीसाहेब संस्थानचे अध्यक्ष माजी आमदार गुलाबचंद राठी व विश्वस्तांच्या पुढाकाराने संस्थानच्या सत्तर एकर क्षेत्रावर विविध प्रकारच्या उपयुक्त फळझाडांची लोकसहभागातून मागील दोन वर्षापासून महाराष्ट्रातील पहिली शेतकरी उपयोगी फळबागेची निर्मिती केली जात असून आजपर्यंत सात हजार झाडे लावण्यात आली आहेत. त्यासाठी दर रविवारी वृक्षप्रेमी येथे एकत्र येऊन फळझाडांची लागवड करून त्यांचे संगोपन करतात. 

भोगाव देवी प्रतिष्ठाणच्या आवाहनाला प्रतिसाद

नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून प्रत्येक कुटुंबाने नऊ झाडे लावण्याचे आवाहन पर्यट स्थळातर्फे करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद देत शनिवारी (ता.२४) आदीशक्तीच्या दर्शनासाठी मानवत, परभणी, वसमत, हिंगोली, जिंतुर येथून आलेल्या चाळीस कुटुंबांनी या उपक्रमात सहभाग नोंदवून प्रत्येक कुटुंबाने नऊ फळझाडे लावून आई जगदंबेला हिरवा शालू नेसवला. त्यामुळे आनंददायी सणाला निसर्गाची साथ देऊन एक वेगळाच पायंडा भोगावदेवी पर्यटन स्थळाच्यावतीने पार पाडला आहे.

यांनी घेतला वृक्षलागवडमध्ये सहभाग

यावेळी शिवसांब सोनटक्के, गंगाबाई  सोनटक्के यांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आले. दुपारी वन भोजनानंतर ४०० फळझाडांची लागवड करण्यात आली. यावेळी शितल सोनटक्के, नीता जगताप, किरण जाधव, प्रियंका देशमुख, सुरेखा जोशी, अर्चना चाफे कानडे, श्रीमती कऱ्हाळे, श्रीमती सावन्त, रोहिणी, नम्रता, अश्विनी, शर्मिला, सामाले, राजुरे, डाढाळे, कोरडे, गोकर्णा, ऐश्वर्या, दुधाळकर, रुपाली, अंबुरे, अणेराव, रत्नपारखी, रोकडे, प्रियांका, रणखांबे, राही, कांचन, अवचार, मंगलबाई, शांताबाई अवचार, रवि देशमुख, प्रा. किरण सोनटक्के, विनायक जाधव, चित्रकार शिवराज जगताप, अमोल सोनटक्के, बाळासाहेब देशमुख, प्रा. चाफे, प्रा. सूर्यवंशी, खपरले एन. पी., प्रा. पी. व्ही. कदम, विशाल पोले, धनराज राजुरे, नवनाथ सोनटक्के, डी. एस. शेळके, ओ. एच. पवार, अमोल राठोड, शिवाजी तिळवे, शरद नीलवर्ण, प्रविण शेळके, उद्धव बोनर आदींसह अनेक भाविक उपस्थित होते.

दर्शनाला आलेल्या भाविकांनी याठिकाणी एकतरी झाड लावावे

सह्याद्रीच्या छोट्या छोट्या रांगांच्या कुशीत देवीसाहेब संस्थानच्या परिसरात तलावाच्या किनारी विसावलेले हे निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. परिसरातील वनराईला पूर्व वैभव प्राप्त होऊन पर्यावरणाच्या संतुलनाला हातभार लागावा तद्वतच फळबागेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी मदत व्हावी हा फळबाग उभारणीमागचा उद्देश असल्याने जगदंबेच्या दर्शनाला आलेल्या भाविकांनी याठिकाणी एकतरी झाड लावून त्याचे संगोपन करावे त्यातून देवीचा परिसर हिरवागार व्हावा हा पर्यटनस्थळ समितीचा मानस आहे.
- अण्णासाहेब जगताप 

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com