'धनगर समाजाला आरक्षण मिळवून देणार, आरक्षणाची लढाई समाजाच्या ताकदीवरच जिंकणार'

गजानन उदावंत
Friday, 29 January 2021

जाफराबाद येथे अहिल्यादेवी होळकर नगरमध्ये कार्यकर्ता संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळेस गोपीचंद पडळकर बोलत होते.

जाफराबाद (जालना): धनगर समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे म्हणुन समाज बांधवाच्या वतीधे विविध आंदोलन करुन सरकार तसेच शासनापर्यंत कागदोपत्री पाठपुरावा केला आहे. शिवाय धनगड ऐवजी धनगर ही जात अस्तित्वात असल्याचे सरकारच्या निर्देशनास आणुन देण्यात आले आहे. समाजहितासाठी आरक्षण हा श्रेयवादाचा मुद्दा नसुन अस्तीत्वाची लढाई आहे, ती लढाई समाजाच्या ताकदीवर जिंकणार असल्याचे आ.गोपीचंद पडळकर यांनी जाफराबाद येथे बोलताना सांगितले.

जाफराबाद येथे अहिल्यादेवी होळकर नगरमध्ये कार्यकर्ता संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी आ.गोपीचंद पडळकर हे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धोंडु दिवटे हे होते तर भाजपा तालुकाध्यक्ष सुरेश दिवटे, जि.प.सदस्य संतोष लोखंडे, गोविंदराव पंडीत, शिवदासजी बीडकर, दिपक बोराडे, प.स.सभापती दगडुबा गोरे, जगन पंडीत, साहेबराव कानडजे, भाजपा शहराध्यक्ष निवृत्ती दिवटे, कैला दिवटे, विजय वैद्य यांची उपस्थिती होती.

राष्ट्रवादीच्या आमदाराला शिवसेनेचा जोरदार धक्का; चार नगरसेवक शिवबंधनात

यावेळी पुढे बोलताना आ.पडळकर म्हणाले की, मेंढपाळा आपली मेंढाराची पालन पोषण करताना अनेक अडचणीचा समाना करावा लागत आहे. अशावेळी मेंढपाळाचा प्रश्न मार्गी लावण्या बरोबरच प्रमुख व्यवसाय नजरे समोर ठेवून मेंढपाळासाठी १० लाख कर्जाची तरतुद करण्यात आली आहे. समाजासाठी आरक्षण हा महत्वाचा मुद्दा असून त्यासंदर्भात केंद्र व राज्य सरकार मध्ये चर्चा सुरु आहे. धनगर समाजाच्या अडीअडचणी सोडविण्या बरोबरच आरक्षण मिळण्यासाठी सदैव पुढाकार घेणार असल्याचे यावेळी आ.गोपीचंद पडळकर यांनी यावेळी सांगितले.

जांबचा बैलबाजार फुलला...! आसपासच्या 5-6 जिल्ह्यातील लोकांची खरेदी-विक्रीसाठी...

धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणुन आ.पडळकर हे सदैव प्रयत्नशील असुन त्यांचे समाजहिताचे काम पाहता सर्व धनगर समाज बांधव त्यांच्या पाठीशी खंबीर उभा असल्याचे यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुरेश दिवटे यांनी आपल्या प्रस्ताविकात सांगितले. यावेळी ई.के.सोरमारे, मैनाजी जोशी, समाधान बकाल, प्रमोद फदाट, जगन जोशी, कृष्णा लोखंडे, कारभारी सोरमारे, रुस्तुम दिवटे, सांडु कोल्हे, कोंडीबा सोरमारे, महादु डहाळे, हिंमतराव शेवाळे, नागोराव वैद्य, शेनफड दिवटे, शाम वैद्य, विनोद कोल्हे, सागर सोरमारे यांच्यासह धनगर समाज बांधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजय वैद्य यांनी केले.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gopichand Padalkar said Reservation battle will be won on the strength of society