Gopinath Munde Death Anniversary : असा झाला मुंडेंचा मृत्यू

Gopinath Munde Death Anniversary : असा झाला मुंडेंचा मृत्यू

पुणे : गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू 03 जून 2014ला दिल्लीमध्ये झाला. पहिल्यांदा भाजप सरकार केंद्रात बहुमताने सत्तेत आले होते. त्यानंतर मंत्र्यांचे शपथविधीही झाले. 26 मेला गोपिनाथ मुंडे यांनी केंद्रिय मंत्रीपदाची शपथ घेतली. मुंडे प्रतिष्ठेचे मानले जाणारे असे ग्रामविकास मंत्रालय मिळाले होते. पण त्यानंतर घात झाला आणि बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या पदरी निराशा आली.

03 जूनला 21 लोधी इस्टेटहून विमानतळाच्या दिशेने जात असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. गोपीनाथ मुंडे लोधी इस्टेटहून निघाल्यावर पृथ्वीराज रोड-तुघलक रोडचे इंटरसेक्शन अशलेल्या अरबिंदो मार्गावर पोहोचले. यावेळी सिग्नलवर त्यांची गाडी उभी होती. गाडीत त्यांचे पीए आणि ड्रायव्हर होता. यावेळी उजव्या बाजूने येणाऱ्या इंडिका गाडीची धडक मुंडेंच्या गाडीला बसली. यात मुंडे समोरच्या सीटवर आपटले. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. सकाळी 6.20 च्या सुमारास ही घटना घडली. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र काही वेळातच डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

दरम्यान, आज (ता.03) गोपीनाथ मुंडे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. धनंजय मुंडे यांनी ट्विट करून म्हटले आहे की, 'आप्पा... तुमचाच वारसा चालवतो आहे... संघर्षाचा, जन सामान्यांच्या कल्याणासाठी... सदैव तुमच्या आठवणीत. विनम्र अभिवादन'!

तसेच, गोपीनाथ मुंडे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त परळीमधील गोपीनाथगड येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला व बालकल्याणविकास मंत्री पंकजा मुंडे तसेच बीड लोकसभा मतदारसंघाच्या खा. प्रितम मुंडे उपस्थित आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com