
राज्यपाल कोश्यारी हे शासकीय विश्रामगृहात अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याने त्याच ठिकाणी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी अधिक लक्ष केंद्रीत केले आहे
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हिंगोलीत दाखल; शहराला आले छावणीचे स्वरूप
हिंगोली: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे हिंगोली शहरात सकाळी साडेदहा वाजता शासकीय विश्रामग्रहात आगमन झाले. त्यांच्या दौऱ्यानिमित्ताने शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून चारशे पोलिस कर्मचारी त्यांच्या बंदोबस्तासाठी तैनात आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना झेडप्लस सुरक्षा असल्याने त्यांच्या सुरक्षेची विशेष खबरदारी घेण्यात येत असून हिंगोली शहराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे . ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे . प्रभारी जिल्हाधिकारी बरगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या सह प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. विशेष म्हणजे राज्यपाल कोश्यारी हे शासकीय विश्रामगृहात अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याने त्याच ठिकाणी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. (bhagat singh koshyari in hingoli)
राज्यपालांची सुरक्षा महत्वाची असल्याने सुरक्षा पासेसशिवाय कोणालाही आतमध्ये प्रवेश दिला जात नव्हता. जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्यासह अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतिष देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे आणि आठ पोलिस निरीक्षक, ३६ सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक असे ४०० पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आहे.
हेही वाचा: 'लोकांमध्ये मिसळल्यावरच नवीन गोष्टी शिकायला भेटतात'
रस्त्यारस्त्यावर तसेच चौकाचौकात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विश्रामगृहात सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवल्याने छावणीचे स्वरुप आले आहे. हिंगोली शहरातील वाहतुकीमध्ये काहीसा बदल करण्यात आला आहे. राज्यपाल कोश्यारी औंढा नागनाथ मार्गे हिंगोलीत आले आहेत. त्यामुळे कयाधु पुलावरून येणारी वाहतुक पेन्शपुरा रोड, गोदावरी कॉर्नर, हरण चौक, गिरीष मेडीकल, घडवाई हनुमान मंदिर मार्गे महात्मा गांधीचौक, जवाहर रोड खुराना पेट्रोल पंप, आखरे मेडीकल कॉर्नर बुलढाणा बैंक, रेल्वे उडान पुल, अकोला बायपास या मार्गावरून सुरू ठेवण्यात आली होती.
हेही वाचा: बीड जिल्ह्यातील पशुधनाचे आरोग्यही रामभरोसेच!
कयाधु नदीपासुन पुढे येणाऱ्या मार्गावरील नांदेड नाका जुनी पोलिस वसाहत, इंदिरा गांधी चौक, नगर परिषद कॉर्नर, छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावरून इतर वाहन चालकांना निर्बध घालण्यात आले होते. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात होणारी विविध विभागाची आढावा बैठक आता शासकीय विश्रामग्रहातच होत आहे.
Web Title: Governer Bhagat Singh Koshyari Welcomed In Hingoli
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..