Chakur News : दुष्काळी संकटात सरकार आणि समाजाने खांद्याला खांदा लावून काम करावे; राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे प्रतिपादन

चाकूर तालुक्यातील नायगाव येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.
Governor Jishnu Dev Varma

Governor Jishnu Dev Varma

sakal

Updated on: 

चाकूर - दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार विविध स्तरांवर प्रयत्न करीत आहे. नुकसानभरपाई, कर्जमाफी, रोजगाराची उपलब्धता आणि जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था यांसह तातडीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर अवलंबून न राहता भविष्यात जलसंकट उद्भवू नये, यासाठी नदीजोड प्रकल्पासारख्या कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या संकटाच्या काळात सरकार आणि समाजाने एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले.

Loading content, please wait...