शासन परिपत्रकाची अंमलबजावणी होईना

4849.LetterWriting.jpg
4849.LetterWriting.jpg


नायगाव, (जि. नांदेड) ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर जोखीम पत्करून काम करणाऱ्या आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्त्या व मदतनीसांना प्रोत्साहन म्हणून नियमित वेतनाव्यतिरिक्त एक हजार रुपये देण्यात यावेत आणि विमा काढण्याचे आदेश (ता. ३१) मार्च रोजी शासनाने दिले आहेत. पण अनेक ग्रामपंचायतींनी अद्यापही प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत व विमा काढण्यासाठी टाळाटाळ करत आहेत.


एकूण ६७६ जणांना याचा लाभ मिळणार 
वरील बाबी या शासकीय कामाचा भाग असल्या तरी जोखीम पत्करून काम करत असल्याने त्यांना मिळणाऱ्या नियमित सेवन व मानधनाव्यतिरिक्त एक हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता देण्यात यावा. तसेच कोरोना विषाणूच्या विरोधात लढा देणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण पँकेज’ अंतर्गत ९० दिवसांसाठी ५० लाखांचा विमा उतरविण्यात आला आहे. त्याच धर्तीवर ग्रामपंचायतींतर्गत काम करणाऱ्या वर नमूद कर्मचाऱ्यांचा विमा जिल्हा परिषदेमार्फत उतरविण्यात यावा, असेही शासन परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. वरील दोन्ही खर्च हा १४ व्या वित्त आयोगाच्या बँकेतील रकमेवरील व्याजातून करण्यात यावा. ही रक्कम कमी पडत असेल तर १४ व्या वित्त आयोगाच्या मागच्या पाच वर्षांतील शिल्लक अखर्चित रकमेतून करण्याचेही आदेश दिले आहेत. शासनाच्या (ता. ३१) मार्च रोजीच्या परिपत्रकानुसार नायगावसह बरबडा, कुंटूर, मांजरम, नरसी या पाच मंडळांतील अंगणवाडी सेविकांची संख्या १९९, मिनी अंगणवाडी सेविका २६, अंगणवाडी कार्यकर्ती १९४, आशा वर्कर १०२, तर ग्रामपंचायतींचे कर्मचारी १५५ यांचा समावेश असून नायगाव तालुक्यातील एकूण ६७६ जणांना याचा लाभ मिळणार आहे.


राज्याच्या ग्राम विकास विभागाने प्रोत्साहन भत्ता व विमा काढण्याबाबत शासन परिपत्रक काढून १५ दिवसांचा कालावधी होत आहे; पण असंख्य ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि ग्रामसेवकांनी शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही. कोरोनामुळे कित्येक ग्रामसेवक गावात फिरकतही नसल्याने ग्रामपंचायत स्तरावर काम करणारे कर्मचारी या प्रोत्साहन भत्यापासून वंचित आहेत. नायगाव तालुक्यातील एकाचाही विमा काढण्यात आला नाही. विशेषतः पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रोत्साहन भत्ता व विमा काढण्याबाबत कुठल्याच सूचना देत नसल्याने अनेक ग्रामसेवक मनमानी करत आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी काम करणाऱ्या एखाद्या कर्मचाऱ्याचा जीव गेल्यास लागल्यास याला जबाबदार कोण राहणार, असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.


रोत्साहन भत्ता देण्याचे काम चालूच
या वेळी शासनाच्या आदेशानुसार एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे काम चालूच असून जो ग्रामसेवक देण्यास टाळत असेल त्यांना कडक सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर विमा काढण्याबाबत थोडी गोंधळाची परिस्थिती असून ज्या कंपनीकडून विमा काढण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत त्या कंपनीला शासनाकडून अधिकृत पत्र आले नाही. तसे पत्र येताच विमा काढण्यात येईल असे एम. एन. केंद्रे, गटविकास अधिकारी, नायगाव यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com