
धाराशिव : सरकारचा कार्यकाळ अजून तीन वर्षे बाकी आहे. त्यामुळे निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांबाबत योग्यवेळी निर्णय घेऊ. मोठ्या शेतकऱ्यांऐवजी गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत विचार सुरू आहे. त्यामागे खऱ्या गरजूंना कर्जमाफी मिळावी हा हेतू आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी (ता. ७) येथे पत्रकार परिषदेत दिली.