
लातूर : बाजारपेठेत सोयाबीनचे भाव पडल्याने शासनाने हमीभावाने खरेदी केंद्रे सुरू केली. पण, रडत पडत ही केंद्रे साडेचार महिने चालविण्यात आली. कधी बारदाना नाही म्हणून केंद्रे बंद राहिली, तर कधी धिम्या गतीने खरेदी सुरू राहिल्याने आठ-आठ दिवस वाहनांच्या रांगा लागल्या. असे करीत शासकीय सोयाबीन खरेदीची मुदत संपली. यात नोंदणी करूनही राज्यात अडीच लाख शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी झाले नाही. यात मराठवाड्यातील दीड लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे. शासनाने खरेदीसाठी मुदतवाढ देण्याची किंवा भावातील फरक देऊन दलासा द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.