esakal | coronavirus-शासनाने जबाबदारी घेतली, लोकांनी खबरदारी घ्यावी - मुंडे 
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

मंत्रिमंडळाची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मंगळवारी (ता. सात) झाली. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात  पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी करीत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला;

coronavirus-शासनाने जबाबदारी घेतली, लोकांनी खबरदारी घ्यावी - मुंडे 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड - कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून लॉकडाऊनच्या काळात जिल्हावासीयांनी आतापर्यंत सहकार्य केले. यापुढेही करावे. अत्यावश्यक कामांसाठीही गरजेपुरतेच बाहेर पडावे, जनतेने खबरदारी घ्यायची असून तुमची जबाबदारी शासनाने घेतली, असे पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले. 

मंत्रिमंडळाची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मंगळवारी (ता. सात) झाली. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या श्री. मुंडे यांनी कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी करीत असलेल्या उपाययोजनांचा आढावाही घेतला; तसेच विविध सूचनाही केल्या. यावेळी आमदार प्रकाश सोळंके, माजी आमदार अमरसिंह पंडित, आमदार बाळासाहेब आजबे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.