
फुलंब्री : राज्य शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली असून प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणींना न चुकता पंधराशे रुपये मिळत आहे. मात्र लाडक्या बहिणीच्या नादात शेतकऱ्याकडे सरकारचे दुर्लक्ष होऊ लागले आहे. फुलंब्री पंचायत समिती अंतर्गत देण्यात येणाऱ्या वैयक्तिक लभाचे 1873 लाभार्थ्यांचे 15 कोटी 53 लाख रुपये सरकारकडे थकले आहे. त्यामुळे अनुदानासाठी शेतकरी पंचायत समितीचे उंबरठे झिंजवत आहे. त्यामुळे लाडके बहीण जोमात शेतकरी कोमात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.