Manoj Jarange Patil : ‘मस्साजोग प्रकरणी सरकारचा छुपा अजेंडा’

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सरकार छुपा अजेंडा चालवीत आहे.
manoj jarange patil
manoj jarange patilsakal
Updated on

वडीगोद्री, (जि. जालना) - मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सरकार छुपा अजेंडा चालवीत आहे. मागील तीन महिन्यांत कोणाला सहआरोपी केले का? असा प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री फडणवीस नुसते कागद दाखवून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी आज अंतरवाली सराटी येथे केला.

जरांगे म्हणाले, की मागील दोन महिन्यांपासून सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची याप्रकरणी नियुक्ती करण्याची मागणी केली जात होती. मात्र, ती झाली नाही. शेवटी संतोष देशमुख यांचे कुटुंब व मस्साजोग ग्रामस्थांना आंदोलन करावे लागले. देशमुख हत्या प्रकरण व खंडणी प्रकरणात पोलिस पैसे पुरविणारे, गाड्या देणारे, आश्रय देणारे अद्यापही आरोपी झाले नाहीत.

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत धमकी प्रकरणाबाबत जरांगे यांनी सांगितले, की मुख्यमंत्र्यांनी जाणूनबुजून एक टोळी तयार केली. एकाने महापुरुषांची बदनामी करायची. हे झाल्यावर त्यांचा सांभाळही हेच करतात, संबंधितांवर कारवाई व्हावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com