Gram Panchayat Election : ग्रामपंचायत प्रचार सभेत भाजप आमदारांच्या सभेत गोंधळ

ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आल्याने आता दोन्ही बाजूने ताकद लावली जात आहे
Gram Panchayat Election
Gram Panchayat Electionsakal

बीड : ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आल्याने आता दोन्ही बाजूने ताकद लावली जात आहे. सभा, बैठका, फेऱ्यांना उधाण आले असून अशाच भाजप आमदार लक्ष्मण पवार यांच्या प्रचार सभेत गोंधळ झाल्याची घटना घडली. बुधवारी रात्री रुई (ता. गेवराई) येथे hi घटना घडली. जिल्ह्यात 704 ग्रामपंचायतिच्या निवडणूका होतं आहेत. यातील 40 ग्रामपंचायती व 47 सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित ठिकाणी प्रचार शिगेला पोचला आहे. गेवराई तालुक्यात आमदार लक्षण पवार, माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी मंत्री बदामराव पंडित यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

गेवराई तालुक्यातील रुई येथे बुधवारी संध्याकाळी भाजप आमदार लक्षण पवार आपल्या समर्थकांच्या आघाडीच्या ग्रामपंचायत निवडणूकीच्या प्रचारासाठी गेले होते.या सभेसाठी त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या समवेत गेवराईहूनच आलेल्या एका भाजप पदाधिकाऱ्याने आपल्या भाषणात राष्ट्रवादीचे नेते व पदाधिकाऱ्यांवर टीका केली. यामुळे गावातील विरोधी गट संतप्त झाला व घोषणाबाजी आणि हुर्योबाजी सुरु झाली. यानंतर आमदारांच्या समर्थनार्थ गेवराईहून देखील सार्थकांच्या वाहनांचा ताफा आला. मात्र, दोन्ही गटातील जेष्ठ मंडळींनी समंजस्याची भूमिका घेतल्याने वाढदिवसाच्या शांत झाला. याबाबत माहिती मिळताच गेवराईचे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड देखील पोलीस फौजफाट्यासह रुई गावात दाखल झाले. तत्पूर्वी सव्वा अकरापर्यंत आमदार व त्यांच्यासोबत आलेली मंडळी रवाना झाली होती. मात्र, पुन्हा काही गोंधळ उडू नये यासाठी राठोड पहाटे तीन पर्यंत रुई गावात थांबून होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com