Gram Panchayat Result : हिंगोली तालुक्यातील मतमोजणी सुरु, शहरात कडक बंदोबस्त

file photo
file photo

हिंगोली : हिंगोली तालुक्यात ७८ ग्रामपंचायतीची मतमोजणी सकाळी दहा वाजता कल्याण मंडप येथे कडक बंदोबस्तात सुरू झाली आहे.

हिंगोली तालुक्यात ९५ ग्रामपंचायतसाठी निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली यात १७ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने ७८ ग्रामपंचायतसाठी ८२. ३५ टक्के मतदान झाले ९९ हजार ९८३ पैकी ८२ हजार ३३३ मतदारानी मतदानाचा हक्क बजावला आहे. दरम्यान सोमवारी सकाळी शहरातील कल्याण मंडपात सकाळी दहा वाजता उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या उपस्थितीत २५ टेबलवर तीनशे कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मतमोजणी सुरू झाली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी मतमोजणी ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. सुरवातीला टपाली मतमोजणी सुरू करण्यात आली आहे. 

शहरातून जाणाऱ्या अकोला नांदेड रस्त्यावर नगरपालिके जलळ कल्याण मंडप असल्याने हा रस्ता नगरपालिका ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या पर्यंत वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. मतदान मोजणी होईपर्यंत नांदेड नाका भागातुन, न्यायालयाकडे जाणाऱ्या मार्गावरील महाराष्ट्र बँकेपासून चित्रा कलर लँब मार्गाने परत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातुन अकोला मार्गावर वळण रस्ता काढण्यात आला आहे. ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विजयी उमेदवारांना रँली काढण्यास मनाई करण्यात आली आहे. ध्वनीक्षेपाकावरुन वेळोवेळी सुचना देण्यात येत आहेत. अनेक गावातील गावकरी शहरात आपल्या गावचा निकाल ऐकण्यासाठी दाखल झाले आहेत.

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com