मंगळवेढा - तालुक्यातील ग्रामपंचायतीकडे कार्यरत असलेल्या 178 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा जून 2021 ते मार्च 2022 या दहा महिन्याच्या कालावधीतील वेतनातील फरकापोटी 63 लाख 87 हजार 65 रुपये पंचायत समितीला प्राप्त होऊन देखील अद्याप कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा न केल्यामुळे कर्मचाय्रानी आजपासून पंचायत समितीसमोर आंदोलन सुरू केले.