Grampanchyat Election Result : येळी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत काँग्रेस-शिवसेना आघाडीने मारली बाजी

सरपंचपदी शिवसेनेचे निवृत्ती पवार विजयी ; "ग्यानबा" ची मेक प्रस्थापितांना जिव्हारी लागली !
umarga
umargasakal

उमरगा - तालुक्यातील येळी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीत काँग्रेस - शिवसेना आघाडीने बाजी मारली आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला केवळ चार जागेवर समाधान मानावे लागले.  निवडणुकीसाठी रविवारी (ता. पाच) मतदान झाले होते. सोमवारी (ता.सहा) सकाळी तहसील कार्यालयाच्या सभागृहात मतमोजणी तहसीलदार गोविंद येरमे यांच्या अध्यक्षतेखाली, नायब तहसीलदार (निवडणूक) रतन काजळे, निवडणूक निर्णय अधिकारी बी. एस. भांगे, सहाय्यक अधिकारी दत्ता जाधव यांच्या उपस्थितीत मतमोजणी झाली.

सरपंचपदासाठी पाच जण निवडणूक रिंगणात होते. नऊ सदस्यांच्या जागेसाठी १८ जणात दुरंगी लढत झाली. निवडणूकीत एक हजार ७४८ पैकी एक हजार २८७ जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. शिवसेना-कॉंग्रेस प्रणित रामलिंगेश्वर ग्राम विकास पॅनेल प्रमुख शिवलिंग स्वामी, व्यंकट मोरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडीचे निवृत्ती पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट प्रणित युवा संघर्ष पॅनलचे ग्यानबा उर्फ बाबा पवार यांचा १९४ मतांनी पराभव करत सरपंचपदी विजयी झाले.

निवृत्ती पवार यांना ५२४, ग्यानबा पवार यांना ३३० मते मिळाली. अपक्ष अभिजीत जाधव (१०७), संतोष जाधव (१९१), बालाजी पवार (१३१) तर नोटाला चार मते मिळाली.  प्रभागनिहाय उमेदवारांना मिळालेलेले मतदान पुढीलप्रमाणे :  प्रभाग एक प्रशांत देडे २२९ विजयी, अजय कांबळे १८८. सोमेश्वर हिंडोळे २१५ विजयी, प्रशांत बनसोडे २०६.

शकुंतला मोरे २३० विजयी, सुवर्णा मोरे १८१. प्रभाग २ रामलिंग बिराजदार २८६ विजयी, विजय रेड्डी १३७. सुजाता पराणे २७१ विजयी, महानंदा माळी २७१ विजयी व सोनाली पराणे १६०, लक्ष्मी माळी १४४. प्रभाग तीन अक्षय बिराजदार २१३ विजयी, किरण पवार २०९. नेत्रावती कांबळे २३३ विजयी, निशा देडे १८६. राजाबाई रेड्डी  २७० विजयी, ममता सजगुरे १४३. दरम्यान नूतन सरपंच निवृत्ती पवार यांनी आपण शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे असल्याचे सांगितले. स्थानिक पातळीवर शिवसेनेचे दोन्ही गट निवडणुक रिंगणात होते.

umarga
Gram Panchayat Election Results: बारामतीत अजित पवार गटाचे वर्चस्व तर रोहित पवारांचे गंभीर आरोप म्हणाले, 'स्वतःची पाठ थोपटून...पैसे...'

"ग्यानबा" ची मेक !

ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत स्थानिक पातळीवरील मुद्दे महत्वाचे असतात. सरपंचपदाच्या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे ग्यानबा उर्फ बाबा पवार पराभूत झाले असले तरी, ते प्रस्थापितांच्या पॅनेलमधील महत्वाच्या चार व्यक्तींच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याने विरोधक कांही क्षण हताश झाल्याचे दिसून आले. निकालानंतर फारसा जल्लोष दिसून आला नाही. या निवडणुकीत "ग्यानबा" ची मेक प्रस्थापितांना चांगलीच जेरीला आणल्याची चर्चा या निमित्ताने कार्यकर्ते करीत होते.

umarga
Gram Panchayat Election Results : रांजणगाव सांडस सरपंचपदी प्रदीपा रणदिवे

पोटनिवडणुकीत भाग्यश्री कुंभार बिनविरोध

तीन ग्रामपंचायतच्या चार रिक्त जागेसाठी पोट निवडणूक घेण्यात आली होती, त्यामध्ये हंद्राळ ग्रामपंचायत दोन जागेपैकी एका जागेवर भाग्यश्री कुंभार बिनविरोध निवड झाली असून एक जागा रिक्त आहे. तसेच कोरेगाववाडी व कोळसूर (गुंजोटी) ची प्रत्येकी एक जागा पुन्हा रिक्त राहिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com